रायगड - महाडमध्ये पाच मजली इमारत पडून झालेली दुर्घटना ही अत्यंत गंभीर आहे. आतापर्यंत शहरी भागात इमारत पडल्याच्या अनेक दुर्घटना घडत होत्या. पण, आता ग्रामीण भागातही अशा घटना घडू लागल्या आहेत. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शहरासह ग्रामीण भागातील धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारला याबाबत गांभीर्य नाही, अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दीडशे जण अडकले असल्याची माहिती मिळत आहे, अशी अहिती प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली होती. मात्र सरकारला याबाबत गांभीर्य नाही. आतातरी जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि नागरिकांचे जीव वाचवावे, अशी विनंतीही यानिमित्ताने दरेकर यांनी केली आहे.