महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रकाश आंबेडकरांनी महाआघाडीचे नेतृत्व करावे - लक्ष्मण माने - भाजप

प्रकाश आंबेडकरांनी भाजप-शिवसेनेला मदत होणार नाही, अशी भूमिका घ्यावी, ते जर त्यांना मान्य असेल तर मी त्यांच्यासोबत राहीन. मात्र, त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर मी बाहेर पडेन, असे लक्ष्मण माने यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकरांनी महाआघाडीचे नेतृत्व करावे - लक्ष्मण माने

By

Published : Jul 7, 2019, 2:46 PM IST

Updated : Jul 7, 2019, 5:12 PM IST

रायगड- भाजप- शिवसेना सत्तेला राज्याच्या सत्तेतून बाजूला सारण्यासाठी सर्व पुरोगामी पक्ष व संघटनांच्या महाआघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न मी करत आहे. या सर्व पुरोगामी संघटनांचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांनी करावे, अशी माझी विनंती आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आता हवेत न राहता जमिनीवर यावे, त्यांनी आमच्यासोबत यावे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी केले आहे.

त्याबरोबरच प्रकाश आंबेडकरांनी भाजप शिवसेनेला मदत होणार नाही, अशी भूमिका घ्यावी, ते जर त्यांना मान्य असेल तर मी त्यांच्यासोबत राहीन. मात्र, त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर मी बाहेर पडेन, असे लक्ष्मण माने यांनी सांगितले. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मण माने हे अलिबाग मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली.

प्रकाश आंबेडकरांनी महाआघाडीचे नेतृत्व करावे - लक्ष्मण माने

यावेळी माने म्हणाले, भाजप शिवसेना पक्षाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी पुरोगामी पक्ष व संघटनेने एकत्र येणे गरजेचे आहे. यासाठी शेकापने या आघाडीत सामील व्हावे, अशी भूमिका असून त्याला जयंत पाटील यांनी दुजोरा दिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता हवेत न राहता जमिनीवर येऊन आपल्या पराभवाची कारणे शोधली पाहिजे. त्यांनीही सोबत येणे गरजेचे आहे. तसेच सर्व आंबेडकरी संघटनांशी बोलणी सुरू आहेत. आमची मते जरी जास्त असली तरी त्यांची विभागणी होत आहे. त्यामुळे पुरोगामी संघटनेने भाजप शिवसेनेला टक्कर देण्यासाठी एकत्र येण्याची गरजेचे आहे. त्यामध्ये मला यश येईल, असे माने यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिल्याबाबत विचारले असता, मी राजीनामा दिला आहे. तो प्रकाश आंबेडकर यांनी स्वीकारलेला नाही, असे माने यांनी सांगितले.

Last Updated : Jul 7, 2019, 5:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details