रायगड -भारतीय हवामान खात्याने 9 ते 12 जूनदरम्यान रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या कालावधीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणारे सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा यांची ऑनलाईन बैठक उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी ठाकूर कर्जत यांनी आयोजित केली होती. या बैठकीस उपविभागातील सर्व जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष कर्जत, खोपोली, माथेरान नगरपरिषद, सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत, खालापूर, तहसीलदार कर्जत, खालापूर, कर्जत, खालापूर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुख्याधिकारी कर्जत, खोपोली, माथेरान नगरपरिषद, खालापूर नगरपंचायत, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक आदींना सहभागी करुन घेण्यात आले आहेत.
'तात्पुरत्या स्वरुपात सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे'
या बैठकीमध्ये दरडग्रस्त भागातील व धोकादायक इमारतीमधील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी आवश्यकतेनुसार स्थलांतर करणेबाबत सुचना देण्यात आल्या. त्या दृष्टिकोनातून जवळच्या सुरक्षित निवारा केंद्राचे नियोजन करुन त्या ठिकाणी पाणी, मुलभुत सुविधा व स्वच्छतागृहाची सुविधा असेल याची दक्षता घेवून अन्नधान्य, खाद्यपदार्थांची उपलब्धता होईल याचे नियोजन स्थानिक प्रशासनामार्फत केले जाईल. तरी पूरप्रवण, दरडग्रस्त भागातील व अतिधोकादायक इमारतीतील नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देवून आपात्कालीन परिस्थितीत नजीकच्या निवारा केंद्रात किंवा आपल्या नातेवाईकांकडे 9 जूनपुर्वी तात्पुरत्या स्वरुपात सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. याबाबत सर्व नगरपरिषदा, सर्व नगर पंचायत, ग्रामपंचायत यांनी स्पीकरद्वारे सर्व नागरिकांना अतिवृष्टीबाबत सूचना प्रसारित करायच्या आहेत. सदर कालावधीत तालुक्याचे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यन्वित करण्यात आलेले असून सर्व स्थानिक यंत्रणांनी-नागरिकांनी आपात्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावे. जेणेकरुन मदतकार्य वेळेत सुरु करणे शक्य होईल. नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक तहसील कार्यालय कर्जत 02148- 222037, तहसील कार्यालय खालापूर 02192-275048 व मा. जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग 02141-222118 असे आहेत.
नागरिकांनी अतिवृष्टीच्या अनुषंगाने काळजी घेण्याचे आवाहन
तसेच जिल्हा मार्ग, अंतर्गत रस्त्यावर झाडे, दरड पडून वाहतूक विस्कळित होणार नाही याबाबत उपाययोजना करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. कर्जत उपविभागातील धोकादायक, उंच होर्डिंग, जाहिरातींचे बोर्ड काढून टाकण्यात यावेत. मॅनहोल उघडे राहणार नाहीत, त्यांना झाकण टाकणे वा बॅरीकेटींग करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व नागरिकांनी अतिवृष्टीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
'पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे'