महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतीमध्ये मतदान शांततेत.. सरासरी ९० टक्के मतदान - Raigad

जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी घेण्यात आलेली मतदान प्रक्रिया किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली आहे.

मतदान

By

Published : Jun 23, 2019, 7:48 PM IST

रायगड - जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी घेण्यात आलेली मतदान प्रक्रिया किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली आहे. साडेतीन पर्यंत 68.35 टक्के इतके मतदान झाले आहे. तर रात्री उशीरापर्यंत मतदानाची सरासरी घेण्याचे काम सुरु होते. प्रत्यक्षात सर्व ग्रामपंचायतींचे मतदान सरासरी 90 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.


जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली होती. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरुणांसह वृद्धांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती.


सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागलेल्‍या पहायला मिळाल्‍या आहेत. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्‍याचे आवाहन करीत होते.


काही ठिकाणी दोन गटात शाब्दीक चकमक झाली होती. मात्र कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मतदान प्रक्रिया शांततेत होण्यासाठी जिल्ह्यात 5 अधिकाऱ्यांसह 57 कर्मचारी तैनात होते. शिवाय एक स्‍ट्रायकिंग फोर्सही सज्‍ज होती.

निवडणुक


अलिबाग तालुक्‍यातील सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्‍ठेच्‍या असलेल्‍या चेंढरे आणि वरसोली या दोन ग्रामपंचायत निवडणूकांसाठी मतदान शांततेत पार पडले आहे.


चेंढरे येथील सेंटमेरी शाळेतील मतदान केंद्रासमोर प्रमुख पक्षांचे कार्यकर्ते मोठया संख्‍येने जमले होते. त्‍यामुळे तेथील वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र पोलिसांनी या मतदान केंद्रासमोर मोठा बंदोबस्‍त ठेवला होता.

भाजपाची हातसफाई ?
आज सकाळपासून भाजप आणि शेकापमध्‍ये फेसबुक युद्ध रंगले होते. भाजपचे अलिबाग मतदार संघाचे अध्‍यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी फेसबूकवर टाकलेल्‍या पोस्‍टवरून मोहिते आणि शेकापचे आमदार पंडित पाटील यांचे चिरंजीव सवाई पाटील यांच्‍यात शाब्दिक युद्ध रंगले होते.
चेंढरे ग्रामपंचायत हददीतील रोहिदासनगर येथे महेश मोहिते यांनी सवाई पाटील यांच्‍यावर हात साफ केला असल्याची चर्चा दिवसभर अलिबागेत सुरू होती. मात्र याबाबत पोलीस ठाण्‍यात कुठलीही तक्रार दाखल झाली नाही.


उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंद झाले आहे. सोमवारी 10 वाजल्यानंतर तहसिल कार्यालयात प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूका या थेट पक्ष पातळीवर लढवल्‍या जात नसल्‍या तरी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी त्‍या प्रतिष्‍ठेच्‍या केल्‍या आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूमीवर यातील विजय महत्‍वाचा ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details