पनवेल - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज पनवेलमध्ये मतदान होत आहे. या मतदारसंघासाठी आमदार बाळाराम पाटील यांनी सकाळी नावडे हायस्कूलच्या मतदान केंद्रावर मतदान केले.
पनवेलमध्ये आमदार बाळाराम पाटील यांनी केले मतदान
मावळच्या विजयासाठी आम्ही कटिबद्ध असून मतदार पार्थ पवार यांना नक्की कौल देतील, असा विश्वास बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला.
पनवेलमध्ये आमदार बाळाराम पाटील यांनी केले मतदान
मावळच्या विजयासाठी आम्ही कटिबद्ध असून मतदार पार्थ पवार यांना नक्की कौल देतील, असा विश्वास बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला. मावळ मतदारसंघात युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यात लढत होत आहे.
पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघात आठ लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. विशेष म्हणजे पनवेल आणि उरणमध्ये मोदी लाट थोपविण्यात शेकापला यश मिळाले होते.