रायगड - होम क्वारंटाईन असूनही अनेक लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. अलिबागेत अशाच एका व्यक्तिविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अलिबागेत मोकाट फिरणाऱ्या होम क्वारंटाईन व्यक्तीवर गुन्हा दाखल; रायगडमध्ये आतापर्यंत 12 गुन्हे - रायगड कोरोना अपडेट्स
सदरील व्यक्ती होम क्वारंटाईन होती, तिचा क्वारंटाईनचा कालावधी संपलेला नाही. असे असतानादेखील शहरात फिरत होती, रेशन दुकानात काम करत होती ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी सदर व्यक्तिला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत असे 12 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील 9 गुन्हे हे दिघी सागरी पोलीस ठाण्यात तर महाड, अलिबाग व एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.