महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यातील रसायनी आपटा घेरावाडी येथे गावठी हातभट्टीवर पोलिसांची धाड - raigad Police raid news

रसायनी पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती आधारावर त्यांच्या पथकाने आपटा गावाच्या हद्दीमधील घेरावाडी येथील डोंगराळ भागात धाड टाकली. यावेळी त्याठिकाणी त्यांना एक महिला दारू गाळतांना आढळून आली. त्यांनी तीच्यावर कारवाई करत पञ्याची २०० लिटरची टाकी, जमिनीमध्ये पुरलेल्या २०० लिटर क्षमतेचे ४ ड्रम यासह गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले.

raigad Police raid latest update
रायगड येथे गावठी हातभट्टीवर पोलिसांची धाड

By

Published : May 27, 2021, 2:22 PM IST

खालापूर (रायगड) -रायगड जिल्ह्यातील रसायनी आपटा घेरावाडी येथे बुधवारी गावठी हातभट्टीवर पोलिसांची धाड टाकली आहे. यावेळी जमिनीमध्ये पुरलेल्या २०० लिटर क्षमतेचे ४ ड्रमसह गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले. तसेच या प्रकरणी संगिता अनंत चव्हाण, वय ३५ वर्षे, रा.घेरावाडी या महिलेला अटक केली आहे.

रायगड येथे गावठी हातभट्टीवर पोलिसांची धाड

दारू बनविण्याचे साहित्य पोलिसांनी केले जप्त -

रसायनी पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती आधारावर त्यांच्या पथकाने आपटा गावाच्या हद्दीमधील घेरावाडी येथील डोंगराळ भागात धाड टाकली. यावेळी त्याठिकाणी त्यांना एक महिला दारू गाळतांना आढळून आली. त्यांनी तीच्यावर कारवाई करत पञ्याची २०० लिटरची टाकी, जमिनीमध्ये पुरलेल्या २०० लिटर क्षमतेचे ४ ड्रम यासह गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले.

महिलेवर गुन्हा दाखल -

आपटा गावचे हद्दीतील घेरावाडी आदिवासी डोंगराळ भागात संगिता अंनत चव्हाण, वय ३५ वर्षे, रा. घेरावाडी या राहतात. त्यांच्याकडे गैरकायदा गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे साहित्य व रसायन तसेच गावठी हातभट्टीची तयार दारू मिळून आले. याप्रकरणी महिलेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ खंड क,ई,फ. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - 'मला मुलगी हवी होती' म्हणत, दारूच्या नशेत बापाने एक वर्षाच्या चिमुकल्याला दगडावर फेकले

ABOUT THE AUTHOR

...view details