रायगड (महाड) - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्यांना संगमेश्वर येथून महाड येथे आणण्यासाठी येत आहे. थोड्याच वेळात ते महाडमध्ये दाखल होणार आहे. या पार्श्वभूमिवर महाडला छावणीचे स्वरूप आले आहे. शहरात तसेच पोलीस ठाणे, न्यायालयाबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे महाडमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे.
महाड : एमआयडीसी पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त; अनेक रस्ते सर्वसामान्यांसाठी बंद - महाडमध्ये पोलीस छावणीचे स्वरूप
थोड्याच वेळात पोलीस नारायण राणेंना घेऊन महाडमध्ये दाखल होणार आहे. या पार्श्वभूमिवर महाडला छावणीचे स्वरूप आले आहे. शहरात तसेच पोलीस ठाणे, न्यायालयाबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
Police escort outside MIDC police station in mahad
शहराला छावणीचे स्वरुप -
नारायण राणे यांना महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना महाड येथे प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे न्यायालय राणे यांना सोडणार की जामीन देणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. मात्र, सध्यातरी महाड शहरात पोलीस छावणीचे रूप आले आहे. तर अनेक रस्ते हे सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद केले आहेत.
Last Updated : Aug 24, 2021, 8:08 PM IST