महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिलेंडरच्या रिकाम्या टाक्या चोरणाऱ्या सात आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कॉन्फीडन्स गॅस प्रा. लि. या कंपनीत एलपीजी गॅस सिलेंडरच्या रिकाम्या टाक्या बनविण्याचे काम चालते. 7 आणि 12 मार्चला कंपनीमधून 319 सिलेंडर टाक्या अज्ञात चोरट्यांनी चोरल्या होत्या. मात्र, कंपनीमध्ये सीसीटीव्ही नसल्याने आणि चोरट्याने कोणताही पुरावा ठेवला नसल्याने पोलिसांसमोर एक आव्हान निर्माण झाले होते.

raigad
पोलीस पथक

By

Published : Jun 23, 2020, 5:26 PM IST

Updated : Jun 23, 2020, 10:00 PM IST

रायगड- सिलेंडरच्या रिकाम्या टाक्या चोरणाऱ्या सात आरोपींच्या खालापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत पौध गावातील कॉन्फीडन्स गॅस प्रा.लि. या कंपनीतील गॅस सिलेंडरच्या 319 रिकाम्या टाक्या चोरट्यांनी पळवल्याची तक्रार कंपनी प्रशासनाने खालापूर पोलीस ठाण्यात केली होती. खालापूर पोलिसांनी या आरोपीकडून 79 रिकामे सिलेंडर जप्त केल्याची माहिती खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी दिली.

सिलेंडरच्या रिकाम्या टाक्या चोरणाऱ्या सात आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

खालापूर तालुक्यातील कॉन्फीडन्स गॅस प्रा. लि. या कंपनीत एलपीजी गॅस सिलेंडरच्या रिकाम्या टाक्या बनविण्याचे काम चालते. 7 आणि 12 मार्चला कंपनीमधून 319 सिलेंडर टाक्या अज्ञात चोरट्यांनी चोरल्या होत्या. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, कंपनीमध्ये सीसीटीव्ही नसल्याने आणि चोरट्याने कोणताही पुरावा ठेवला नसल्याने पोलिसांसमोर एक आव्हान निर्माण झाले होते. त्यामुळे चार महिन्यापासून या चोरीचा तपास करण्यात पोलिसांना अपयश आले होते.

अखेर खबऱ्याने पोलीस नाईक नितीन शेडगे व रणजित खराडे यांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार ही चोरी वणवे येथील महादेव वामन वाघमारे याने व त्याच्या साथिदारांनी केल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक, शेखर लव्हे, पोलीस हवालदार योगेश जाधव, पोलीस नाईक नितीन शेडगे, रणजित खराडे, सचिन व्हसकोटी, हेमंत कोकाटे व पोलीस शिपाई दत्तात्रय किसवे, व चालक जगदीश वाघ यांच्या पथकाने प्रथम वणवे येथील आरोपीस ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर गुन्हा कबूल करून त्याने साथीदारांची नावे सांगितले. त्यानंतर लोहोप, कर्जत, हाळ खुर्द, मोहपाडा, या ठिकाणाहुन आरोपींना ताब्यात घेतले. पाच आरोपीसह माल खरेदी करणाऱ्या दोघांना असे सात जणांना खालापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन 79 सिलेंडर टाक्या, वाहन असा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 25 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास खालापूर पोलीस करत आहेत.

Last Updated : Jun 23, 2020, 10:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details