महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उरणमध्ये 2 तरुणांवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल, आरोपींना बेड्या - crime news

उरणमधील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी जयेश पाटील व मनीष देवरे यांच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोक्सोचा गुन्हा दाखल
पोक्सोचा गुन्हा दाखल

By

Published : Aug 5, 2021, 4:10 PM IST

रायगड -उरणमधील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी जयेश पाटील व मनीष देवरे यांच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लग्नाचं अमिश दाखवून केली जबरदस्ती
१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला मार्च ते मे २०२१ या दरम्यान आरोपी जयेश पाटील याने 'माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्याशी लग्न करीन' असे आमिष दाखवित नागाव येथील एका रूमवर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. तर मनीष देवरे याने एप्रिलमध्ये इन्स्टाग्रामवर मैत्री करीत भेटावयास बोलावून नवीन शेवा येथील एका पडक्या इमारतीमध्ये नेऊन माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगून जबरदस्तीने कपडे काढून शरीर संबंध केले. या शरीर सबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने सदरचा प्रकार उघडकीस आला आहे.

उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्याकडे तक्रार दाखल होताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी जयेश पाटील व मनीष देवरे यांना अटक करून पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे.

बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल
गुन्हा रजिस्टर नंबर २३६/२०२१ भादवी कलम ३७६, ३७६(२) (एन) महाराष्ट्र बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा २०१२ चे कलम ४,५ (जे) (२) (एल) सहवाचन कलम ६, कलम ८ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनी प्रकाश पवार यांनी गुन्हा दाखल केला आहे. तर पुढील तपास मसपोनी वृषाली पवार या करीत आहेत.

हेही वाचा -उपराजधानीत कोरोनानंतर डेंग्यूचे थैमान; पंधरा दिवसात १०६४ डेंग्यूचे रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details