रायगड - महाड औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी वाहून नेण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनला आग लागल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. अग्नीशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
सांडपाणी वाहून नेण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनला आग हेही वाचा - मी असा किती दिवस मार खाऊ? वृद्धेच्या प्रश्नाने जयंत पाटील भावूक
या घटनेमुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. आग आणि धुराचे लोट पसरल्याने राजेवाडी फाटा परिसरात गोंधळ उडाला होता. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान औद्योगिक वसाहतीची सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन नव्याने टाकण्याचे काम सुरू आहे. महामार्गालगत मोकळ्या जागेत एचडीपीई प्रकारचे पाईप ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचा - 'त्या' टि्वटमुळे कपिल मिश्रा यांना निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस