पनवेल -बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे. सख्ख्या भावानेच बहिणीवर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी पॉक्सो, लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
धक्कादायक ! पनवेलमध्ये सख्ख्या भावानेच केला बहिणीवर बलात्कार
बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे. सख्ख्या भावानेच बहिणीवर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी पॉक्सो, लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन (16 वर्षीय) मुलीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला कामा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे ती गर्भवती असल्याचे लक्षात येताच याबाबत तिच्या आई वडिलांनी विचारपूस केली. त्यावेळी तिच्या सख्ख्या भावानेच तिच्यावर बलात्कार केल्याचे तिने सांगितले. दोघेही भाऊ-बहीण हे महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. ऑगस्ट महिन्यात पीडित मुलगी मध्यरात्रीच्या सुमारास झोपलेली असताना तिच्या भावाने जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले.
लैंगिक अत्याचार करणारा आपला सख्खा मोठा भाऊच असल्याने पीडित मुलीने घाबरून तसेच बदनामीच्या भीतीने सदर प्रकाराची माहिती कुणालाच दिली नाही. मुलीच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला असून, त्यांनी जबाब नोंदवून आरोपी मुलावर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित गुन्हा पनवेल भागात घडल्याने आझाद मैदान पोलिसांनी हा गुन्हा खांदेश्वर पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग केला आहे.