महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! रोह्यात 15 वर्षीय मुलीचा बलात्कार करुन खून... - रायगड पोलीस बातमी

रविवारी संध्याकाळपासून ही मुलगी बेपत्ता होती. त्यामुळे कुटुंबियांकडून तिचा शोध सुरू होता. सायंकाळी ताम्हणशेत येथील ओहळाजवळ या मुलीचा मृतदेह सापडला. याबाबतची माहिती रोहा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

physical-abused-and-murder-of-minor-girl-in-raigad
रोह्यात 15 वर्षीय मुलीचा बलात्कार करुन खून...

By

Published : Jul 27, 2020, 4:36 PM IST

रायगड- रोहा तालुक्यातील तांबडी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी सायंकाळी उशिरा ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोह्यात 15 वर्षीय मुलीचा बलात्कार करुन खून...

रोहा तालुक्यातील तांबडी येथे एका 15 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी संध्याकाळपासून ही मुलगी बेपत्ता होती. त्यामुळे कुटुंबियांकडून तिचा शोध सुरू होता. सायंकाळी ताम्हणशेत येथील ओहळाजवळ या मुलीचा मृतदेह सापडला. याबाबतची माहिती रोहा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा रोहा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ हे रोह्यात दाखल झाले आहेत. रोहा पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास रोह्याचे डिवायएसपी किरण सूर्यवंशी हे करत आहेत. दरम्यान, या घटनेबाबत रोह्यामधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, यावेळी घटना समजताच रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन हे कृत्य करणार्‍या नराधमाला लवकरात लवकर अटक करुन कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशा सूचना रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांना दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details