महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड लॉकडाऊन; जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची बाजारात झुंबड - रायगड लॉकडाऊन न्यूज

कोरोनाची ही साखळी तोडणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. सोमवारी 13 जुलैला पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांची लॉकडाऊनबाबत बैठक झाली. यामध्ये जिल्ह्यात पुन्हा दहा दिवसाचे लॉकडाऊन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 24 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.

raigad latest news  raigad lockdown news  people gathered market raigad  रायगड लॉकडाऊन न्यूज  रायगड लेटेस्ट न्यूज
रायगड लॉकडाऊन; जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची बाजारात झुंबड

By

Published : Jul 14, 2020, 1:36 PM IST

रायगड - जिल्ह्यात 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 24 जुलैपर्यंत पुन्हा दहा दिवसाचे लॉकडाऊन जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. हे लॉकडाऊन कडक असून यामध्ये जीवनावश्यक वस्तूची दुकानेही बंद राहणार आहेत. त्यामुळे दहा दिवसांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील भाजी, मासळी बाजार, किराणा दुकानात नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढू लागला असून ही संख्या नऊ हजाराच्या जवळपास पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. सोमवारी 13 जुलैला पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांची लॉकडाऊनबाबत बैठक झाली. यामध्ये जिल्ह्यात पुन्हा दहा दिवसाचे लॉकडाऊन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 24 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.

रायगड लॉकडाऊन; जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची बाजारात झुंबड

जिल्ह्यात दहा दिवसांचे लॉकडाऊन जाहीर झाले असले तरी जीवनावश्यक खरेदी करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजी, मासळी बाजारात नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे, तर किराणा स्टोअर्स, सुपर मार्केटमध्येही जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. या दहा दिवसांच्या काळात फक्त मेडिकल स्टोअर सुरू राहणार असून बाकी सर्व दुकाने बंद राहणार असल्याने दोन दिवसांत जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. बाजारातही वाहनांची आणि नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details