कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना रायगडकरांनी दिला मदतीचा हात - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी राज्याच्या विविध भागांतून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. रायगड जिल्ह्यातूनही पूरग्रस्त भागात मदत पोहचवण्यासाठी नागरिकांसह सामाजिक संस्था, प्रशासन यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
![कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना रायगडकरांनी दिला मदतीचा हात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4100491-thumbnail-3x2-raigad-help.jpg)
रायगडकरांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
रायगड -कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये पुराने थैमान घातले आहे. अनेक कुटुंबं निराधार झाली असून, घरातील जीवनावश्यक वस्तूही पुरात वाहून गेल्या आहेत. पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्तांसाठी राज्याच्या विविध भागातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. रायगड जिल्ह्यातूनही पूरग्रस्त भागात मदत पोहोचवण्यासाठी नागरिकांसह सामाजिक संस्था, प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला आहे.
रायगडकरांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
गेला आठवडाभर राज्यात मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे नद्यांनी आपली पातळी ओलांडली. पुराचे पाणी नागरी वस्तीत घुसल्याने, हजारो नागरिक पाण्यात अडकले. प्रशासन, स्थानिक नागरिक, एनडीआरएफ, भारतीय सैन्य, कोस्टल गार्ड, सामाजिक संस्था यांनी पुरात अडकलेल्यांना बाहेर काढले.खाण्यासाठी अन्न नाही, घालण्यासाठी कपडे नाहीत अशी, परिस्थिती सगळीकडे सध्या निर्माण झाली आहे.
रायगड जिल्हा प्रशासनाकडून पूरभागात खाद्यपदार्थ, पाणी, कपडे याची मदत पाठवण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील सामाजिक संस्था, नागरिक, लोकप्रतिनिधी यांनीही मदतीसाठी हात पुढे केला आहे. जास्तीत-जास्त लोकांनी मदत करावी असे, आवाहन सामाजिक संस्थांकडून करण्यात आले आहे.