पेण (रायगड) -भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयात झालेल्या अग्नीकांडामध्ये दहा चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरले असून त्यामुळे या घटनेकडे पाहता पेण शहरातील सर्व रुग्णालयांची फायर ऑडिट करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
पेण शहरात अनेक मोठ-मोठी रुग्णालये आहेत. मात्र, या रुग्णालयांकडे जर अशा काही घटना घडल्या तर रुग्णांलयात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोणत्या प्रकारची सुरक्षितता आहे. यासाठी फायर ऑडिट करुन तपासणी करावी जेणेकरून अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी रुग्णालयांची फायर ऑडिट तातडीने करण्याचे आदेश द्यावे. जर एखाद्या रुग्णालयात फायर ऑडिटवेळी अंतर्गत सुरक्षिता आढळून आली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.