महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उरणमधील पेन्शनर्स पार्क अतिक्रमणाच्या विळख्यात; पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष - Raigad latest news

रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये पेन्शनर्स पार्क अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. सध्या याठिकाणी फक्त नामफलक उरला असून, येथील परिसरामध्ये मिठमोठी अतिक्रमणे झाली आहेत.

रायगड
रायगड

By

Published : Apr 15, 2021, 3:55 PM IST

रायगड -उरण तालुका हा झपाट्याने विकासाकडे झेप घेणारा तालुका असला तरी येथे मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणे होत आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले पेन्शनर्स पार्क सध्या अशाच प्रकारे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले असून, पालिकेचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सध्या याठिकाणी फक्त नामफलक उरला असून, येथील परिसरामध्ये मिठमोठी अतिक्रमणे झाली आहेत.

आता फक्त उरला तो नामफलक -

सध्या उरण तालुक्यामध्ये झपाट्याने विकास कामे होत आहेत. येथील शहरी भाग हा नगरपालिकेच्या माध्यमातून विकसित केला जात आहे. क वर्ग श्रेणीमधील नगरपालिका असतानाही येथील विकास कामांच्या दृष्टीने पालिकेचे कार्य उत्तम आहे. मात्र, येथील रस्ते आणि इतर जागांवर बेफाम होणारे अतिक्रमण याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. येथील नगरपालिका शाळेसमोर ज्येष्ठ नागरिकांसाठी बऱ्याच वर्षांपूर्वी पेन्शनर्स पार्क ही संकल्पना उदयास येऊन, याठिकाणी पालिकेच्या माध्यमातून पेन्शनर्स पार्क तयार करण्यात आले होते. यावेळी सिमेंटचे बाकडे, अशोकाची झाडे लावून ज्येष्ठांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याचे स्वागत ज्येष्ठ नागरिक संघटनेकडून करण्यात आले होते. मात्र, सध्या या पेन्शनर्स पार्कवर खाद्यपदार्थाच्या टपऱ्यांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे पेन्शनर्स पार्क आता खाउगल्ली बनले आहे. याठिकाणी आता फक्त पेन्शनर्स पार्क असा नामफलक उरला असून, बाकी जागा अतिक्रमण धारकांनी बळकावली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सध्या बालोद्यानाचा आधार घ्यावा लागत आहे. पालिकेने याकडे लक्ष केंद्रित करून, संबंधित अतिक्रमण मोकळे करून, पुन्हा एकदा या पेन्शनर्स पार्कला नवी झळाळी द्यावी अशी मागणी होत आहे.

जेष्ठांना खचता खाव्या लागत आहेत -

गेली अनेक वर्षे येथील पेन्शनर्स पार्क येथे ज्येष्ठ नागरिक एकत्र येत हितगुज करत होते. मात्र, येथे झालेल्या अतिक्रमणामुळे पेन्शनर्स पार्क म्हणून फक्त नामफलक उरला आहे. या नामफलकाचे प्रत्येक सणाला ज्येष्ठ नागरिकांकडून पूजन करण्यात येते. त्याचप्रमाणे दरवर्षी हा फलक नव्याने रंगवण्यात येतो. असे असताना ज्येष्ठ नागरिकांचे हक्काचे स्थान परत मिळावे यासाठी ज्येष्ठांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details