पेण ( रायगड ) -पेण येथे पोलिसांनी व्हेल माशाच्या उलटीची विक्री ( Whale Fish Vomit ) करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. येथील सरकारी रुग्णालायच्या परिसरात व्हेल माशाच्या उलटीची विक्री करताना पेण पोलिसांनी पाच जणांना अटक केली ( Pen Police Arrested Five Men ) आहे. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
व्हेल माशांची उलटी गोळा करुन तीची तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, तरीही या माशाच्या उलटीची तस्करी करून यामधून करोडो रुपये कमविले जातात. त्याच पार्श्वभूमीवर व्हेल माशाच्या उलटीची विक्री पेण येथे होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पेण पोलिसांनी शहरात बंदोबस्त लावला. 3 मार्चच्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास उपजिल्हा रूग्णालयाच्या परिसरात इन्होवा क्रिस्टा गाडी ( एम एच ४७ ए टी ८८७९ ) संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी सदर गाडीची कसून तपासणी केली. त्या गाडीत व्हेल माशाची अंदाजे 2 किलो वजनाची उलटी सापडली. सदर उलटीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जवळपास दिड ते दोन कोटी रुपयांच्या वर किंमत आहे.