पेण (रायगड) -पेण नगरपालिकेच्या ( Pen Nagar Panchayat ) कारभाराबाबत आमच्यावर कितीही आरोप करा अथवा आपण कितीही उलट सुलट कारस्थाने केलीत, तरी पेण पालिकेवर पुन्हा एकदा आमची भाजपचीच सत्ता स्थापन होणार असून आम्हीच विजयाची हट्रिक ( Bjp will win Pen Nagar Panchayat ) पूर्ण करणार आहोत, असा विश्वास पेण नगरपरिषदेचे नगरसेवक अजय क्षीरसागर ( Pen Nagar Panchayat Corporator Ajay Kshirsagar ) यांनी व्यक्त केला. तसेच गोर गरीब जनतेच्या कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार आपण पेण अर्बन बँकेत केलात. अशा प्रकारचे भ्रष्टाचार करणे हे आमच्या रक्तातच नाही, प्रत्युत्तरही त्यांनी पेण अर्बन बँकेचे माजी संचालक शिशिर धारकर यांना दिले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिशिर धारकर यांनी पेण पालिकेच्या भ्रष्टाचारासंदर्भात पत्रकार परिषदेतून सत्ताधाऱ्यांवर आरोप केले होते. त्यावर बोलताना नगरसेवक अजय क्षीरसागर यांनी बोलताना सांगितले की, शिशिर धारकर हे पेण अर्बन बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत. त्यांनी विद्यमान आमदार आणि राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री रविशेठ पाटील यांच्यावर केलेले आरोप म्हणजे एक प्रकारचा बालिशपणा आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा आम्ही पेण शहर भाजपच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. पेण पालिकेचा कारभार हा पूर्णपणे स्वच्छ असून मागील दहा वर्षात आम्ही केलेली विकासकामे हे याचे ज्वलंत उदाहरण आहे.