रायगड -जिल्ह्यातील पेण-पनवेल या रेल्वे सेवेला आज 11 नोव्हेंबरला एक वर्ष पुर्ण झाले. रेल्वे सेवेच्या या एक वर्षांच्या पुर्ततेचा दिवस म्हणून सोमवारी पेण रेल्वे स्थानकावर 'मी पेणकर, आम्ही पेणकर शाश्वत विकास समिती' यांच्याकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
पेन रेल्वे स्थानकात पेन ते दिवा रेल्वे सेवा वर्षपुर्तीचा आनंदोत्सव साजरा हेही वाचा...दिवाळीतही वाहन उद्योगावर मंदीचा प्रभाव; ऑक्टोबरमध्ये विक्रीत १२.७६ टक्के घसरण
समस्त पेणकरांनी मिळून 'मी पेणकर, आम्ही पेणकर शाश्वत विकास समिती' स्थापन केली आणि पेण-दिवा रेल्वे सुरू होण्यासाठी आंदोलन सुरू केले. दिल्लीत रेल्वे प्रशासनासोबत बैठका घेण्यात आल्या. यानंतर पेणकरांच्या या प्रयत्नांना यश प्राप्त होऊन 11 नोव्हेंबर 2018 रोजी पेण-पनवेल रेल्वे शटल सेवा सुरू झाली. आज 11 नोव्हेंबर रोजी हा दिवस पेणकरांसाठी या अर्थाने अतिशय महत्वाचा आहे. पेण रेल्वे स्थानकात या एक वर्ष पूर्तीचा आनंदोत्सव प्रवाशांना साखर वाटून साजरा करण्यात आला.
हेही वाचा...खासगी रेल्वे तेजस 'सुस्साट'; पहिल्याच महिन्यात ७० लाखांचा नफा
राज्यामध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. याचा विचार करून इतर कार्यक्रम रद्द करून हा वाढदिवस अतिशय सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी स्टेशन मास्तर, मोटरमन यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करून आभार मानण्यात आले.
हेही वाचा...शुल्कवाढी विरोधात 'जेएनयू'चे विद्यार्थी रस्त्यावर, पोलिसांसोबत विद्यार्थ्यांची झटापट
पेणकरांच्या मागाण्यांपैकी शटल सेवा सुरू झाली असली तरी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्यासाठी पेणकरांचा लढा सुरूच आहे. रेल्वे प्रशासनाने शटल सेवा सुरू करण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांप्रमाणेच लांब पल्ल्याच्या गाड्यांना देखील पेण रेल्वे स्थानकात प्रशासन लवकरच थांबा देईल, अशी अपेक्षा पेणकर व्यक्त करत आहेत. यावेळी 'मी पेणकर आम्ही पेणकर' समितीचे योगेश म्हात्रे यांनी पेणकरांच्या सेवेसाठी शटल सेवा सुरू करून दिल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभार मानले, मात्र काही मागण्या आजही प्रलंबित असून त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 26 जानेवारीला छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.