महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाविकास आघाडीचे सरकार आल्याने पनवेलमध्ये शेकापचा जल्लोष - पनवेलमध्ये शेकापचा जल्लोष

राज्यात नव्याने स्थापन झालेली महाविकास आघाडी ही पनवेलमध्ये शेकाप-मनसे-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी नावारूपाला येणार आहे. राज्यात शेकापला पाठबळ देणारे सरकार आले असल्याने शेकापचा आत्मविश्वास वाढला आहे.

पनवेलमध्ये शेकापचा जल्लोष
पनवेलमध्ये शेकापचा जल्लोष

By

Published : Nov 28, 2019, 10:10 PM IST

रायगड -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधीचा पार पडला. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार आले, म्हणून पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षा(शेकाप)च्यावतीने फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला.

महाविकास आघाडीचे सरकार आल्याने पनवेलमध्ये शेकापचा जल्लोष


राज्यात नव्याने स्थापन झालेली महाविकास आघाडी ही पनवेलमध्ये शेकाप-मनसे-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी नावारूपाला येणार आहे. राज्यात शेकापला पाठबळ देणारे सरकार आले असल्याने शेकापचा आत्मविश्वास वाढला आहे. शेकाप कार्यालयासमोर सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन याबाबत जल्लोष साजरा केला. शेकापचे झेंडे नाचवत पेढे वाटून एकमेकांचे तोंड गोड केले.

हेही वाचा - घटनेच्या तत्व आणि मुल्यानुसार राज्याला पुढे नेणार, शेतकरी केंद्रस्थानी - एकनाथ शिंदे
काही दिवसांपूर्वी पनवेलमध्ये भाजपने आपले सरकार येणार म्हणून जल्लोष केला होता. मात्र, याच ठिकाणी महाविकास आघाडीसाठी शेकाप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. 'महाविकास आघाडीचा विजय असो' अशा घोषणाही देण्यात आल्या. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून जनतेच्या कल्याणाची कामे करतील, असे मत शेकापच्या पदाधिकाऱयांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details