महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pawankhind : पावनखिंड चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी पेण टॉकीजला निवेदन - पावनखिंड चित्रपट

पावनखिंड हा मराठी चित्रपट ( Digpal Lanjekar’s New Movie Pawankhind ) पेणमधील चित्रपटगृहात प्रदर्शित ( Pavankhind movie screening Pen Talkies ) करण्यात यावा, या मागणीसाठी पेण शिव सह्याद्री प्रतिष्ठान व शिवप्रेमी संघटनाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. मोरेश्वर चित्रपटगृहाचे व्यवस्थापक यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.

Pawankhind
पावनखिंड

By

Published : Feb 27, 2022, 7:52 AM IST

पेण -दिगपाल लांजेकर दिग्दर्शित असणारा पावनखिंड हा मराठी चित्रपट ( Digpal Lanjekar’s New Movie Pawankhind ) पेणमधील चित्रपटगृहात प्रदर्शित ( Pavankhind movie screening Pen Talkies ) करण्यात यावा, या मागणीसाठी पेण शिव सह्याद्री प्रतिष्ठान व शिवप्रेमी संघटनाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. मोरेश्वर चित्रपटगृहाचे व्यवस्थापक यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित असणारा हा पावनखिंड मराठी चित्रपट लांजेकर यांनी दिग्दर्शित केला असून शिवाजी महाराजांची प्रेरणा, त्यांचे आचार विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याचे दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रकाशित होत असताना पेणच्या कार्निवल चित्रपटगृहांमध्ये अजूनपर्यंत प्रदर्शित का होत नाही, याकरिता सह्याद्री प्रतिष्ठान तसेच शिवप्रेमी आक्रमक झाले.

नुकतेच त्यांनी व्यवस्थापनाला याबाबतचे निवेदन दिले आहे. जर येत्या काही दिवसात पावनखिंड हा मराठी चित्रपट पेणमध्ये प्रदर्शित झाला नाही. तर इतर कोणतेही चित्रपट दाखविता येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र उपाध्यक्ष समीर म्हात्रे, पेण तालुकाध्यक्ष रोशन टेमघरे, केतन म्हात्रे, अनिल देशमुख, निनाद म्हात्रे, अभय म्हात्रे आदिंसह असंख्य पदाधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चित्रपटगृहाचे व्यवस्थापक प्रशांत ओक यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित असणारा पावनखिंड हा मराठी चित्रपट पेणमध्ये दाखविण्याकरीता आपण प्रयत्न करणार.

हेही वाचा -Rokhathok on Marathi language : भाजपचा विचार व्यापारी प्रवृत्तीचा! मराठीचा अभिमान त्यांना नाही;रोखठोक'मधून बाण

ABOUT THE AUTHOR

...view details