महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' मृतदेहाची ओळख पटवण्याचे पनवेल पोलिसांसमोर आव्हान

पनवेलमधल्या हरिग्राम भागातील तरुण सोमवारी सायंकाळी गाढी नदीच्या पात्रात खेकडे पकडण्यासाठी गेला होता. त्याला गाढी नदीजवळ काळ्या रंगाच्या एका रेग्झिन बॅगेतून मानवी हात बाहेर आल्याचे दिसले. त्यामुळे त्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

raigad
'त्या' मृतदेहाची ओळख पटवण्याचे पनवेल पोलिसांसमोर आव्हान; पोलीस तपासाला वेग

By

Published : Dec 22, 2019, 12:51 PM IST

Updated : Dec 22, 2019, 2:02 PM IST

मुंबई -माहिम, चेंबूर, कल्याणनंतर आता पनवेलमध्ये गाढी नदीजवळ एका रेग्झिनच्या बॅगेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या व्यक्तीची हत्या करण्यात आली असून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह या ठिकाणी टाकून दिल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसातील अशा प्रकारची ही चौथी घटना असल्याने हा मृतदेह नक्की कोणाचा आहे? याचा शोध घेण्यासाठी पनवेल तालुका पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे.

'त्या' मृतदेहाची ओळख पटवण्याचे पनवेल पोलिसांसमोर आव्हान

हेही वाचा -पनवेलमध्ये गोणीत सापडला चिमुकल्याचा मृतदेह; परिसरात चिंतेचे वातावरण

पनवेलमधल्या हरिग्राम भागातील तरुण सोमवारी सायंकाळी गाढी नदीच्या पात्रात खेकडे पकडण्यासाठी गेला होता. त्याला गाढी नदीजवळ काळ्या रंगाच्या एका रेग्झिन बॅगेतून मानवी हात बाहेर आल्याचे दिसले. त्यामुळे त्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला असून मृतदेहाच्या अंगावर सापडलेल्या काही वस्तू आणि कपड्यांच्या आधारे आता पनवेल तालुका पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा -बुलडाणा; नकली सोने तारण ठेवून जिजामाता सहकारी बॅंकेला 28 लाखांचा चुना

हत्या झालेली व्यक्ती ही ३० ते ३५ वयाची पुरुष आहे. त्याच्या उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये धातूची अंगठी असून त्यावर दोरा गुंडाळलेला आहे. तसेच मृतदेहाच्या अंगावर हाफ बाह्याचा काळसर रंगाचा शर्ट आणि फुल बाह्याचा टी शर्ट आढळुन आला असून त्यावर VL- Fashion असे लिहिले आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृतदेहाची डीएनए चाचणी केली आहे. यावरून हा मृतदेह २० ते २२ दिवसांपूर्वी हत्या करून टाकण्यात आला असल्याचे समजले आहे.

हेही वाचा -पत्ता विचारण्याच्या बहाण्याने विदेशी पर्यटकांनी चोरली 35 हजारांची रक्कम

शवविच्छेदन अहवालात या मृतदेहाची मान तुटलेली असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचा गळा आवळून किंवा मानेवर वार करून खून केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, केवळ कपडे आणि अंगठीच्या आधारे हा मृतदेह नेमका कोणाचा आहे? आणि त्याची हत्या का केली? याचा शोध घेण्याचे आव्हान पनवेल तालुका पोलिसांसमोर आहे. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी या हत्येचा तपास वेगाने सुरू केला आहे. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृतदेहाच्या अंगावरील कपडे आणि अंगठीचे फोटो पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात पाठवले आहेत.

Last Updated : Dec 22, 2019, 2:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details