रायगड -मार्च महिन्यापासून कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. शासनाने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यतील मंदिरे खुले करण्यास परवानगी दिली आहे. आठ महिन्यानंतर अष्टविनायकापैकी एक असलेल्या पाली बल्लाळेश्वराचे दर्शन आजपासून खुले झाले आहे. त्यामुळे आज गणेश भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात धाव घेतली. पाली बल्लाळेश्वर मंदिर प्रशासनाने कोविडचे नियम पाळून भक्तांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
22 मार्चपासून कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर शासनाने गर्दीची ठिकाणे नागरिकांसाठी बंद केली. यामध्ये समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड, किल्ले, धार्मिक स्थळे यावर जाण्यास पर्यटकांना आणि भाविकांना बंदी केली होती. हळूहळू शासनाने टाळेबंदी शिथिल केल्यानंतर व्यवहार सुरू झाले. समुद्रपर्यटन, गड किल्ले यावर जाण्यास शासनाने परवानगी दिली. मात्र शासन मंदिरे खुली करत नसल्याने आंदोलने करण्यात आली, मोर्चे काढण्यात आले. अखेर शासनाने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली आहे. आजपासून सर्व मंदिरे, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा खुले झाल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोरोनाच्या नियमाचे पालन करून भाविकांना दर्शन