रायगड - काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले आहेत. यामुळे देशभरात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट पसरली आहे. याबाबत भाजप सरकारने आता पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करून सडेतोड उत्तर पाकिस्तानला देण्याबाबत प्रतिक्रिया तरुणाईमधून उमटत आहे. तसेच एनसीसीचे जवानही या युद्धात उतरण्यास मागे राहणार नाहीत. एनसीसीच्या माजी विद्यार्थ्यांना या हल्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.
पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची हीच वेळ - एनसीसी जवान - answer
काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादीनी केलेल्या भ्याड हल्लाला सरकारने आता रोखठोख उत्तर द्यायला पाहिजे. आता कोणतेही सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानवर हल्ला करणे गरजेचे आहे, असे उत्तर एनसीसीचे माजी जवान यांनी दिले.
एनसीसी जवान
पाकिस्तानने हा भ्याड हल्ला न करता अघोषित युद्ध पुकारले आहे. त्यामुळे पाकिस्तानला आता वेळीच ठेचणे गरजेचे असून पुन्हा भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत न करण्यासाठी शासनाने पावले उचलणे गरजेचे आहे. आज देशात लाखो एनसीसी जवान असून प्रसंगी सर्वजण युद्ध भूमीवर जाण्यास आम्ही तयार असल्याची प्रतिक्रिया एनसीसीच्या माजी जवानांनी दिली आहे.