महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

युएईने दिलेले ऑक्सिजन टँक पोहोचले जेएनपीटी बंदरात - ऑक्सिजन लेटेस्ट

जीएसएफ जिजेल हे जहाज ऑक्सिजनचे चार कंटेनर घेऊन दुबईतील जबल अलीहून 5 मे रोजी भारताकडे रवाना झाले होते. ते आज जेएनपीटी बंदरात दाखल झाले आहे. कोविड महामारीच्या परिस्थितीत संयुक्त अरब अमिरातीने भारतास मेडिकल ऑक्सिजन कंटेनरची मदत पाठविली आहे.

संयुक्त अरब अमिरात कडून भारतास ऑक्सिजनची मदत
संयुक्त अरब अमिरात कडून भारतास ऑक्सिजनची मदत

By

Published : May 12, 2021, 9:10 AM IST

रायगड- भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) बंदरात एएक्सएस कंपनीच्या एमव्ही जीएसएफ जिजेल जहाजातुन क्रायोजेनिक स्वरूपातील 80 मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन असलेले चार कंटेनर यशस्वीपणे उतरविण्यात आले. देशातील सध्याच्या कोविड महामारीच्या परिस्थितीत संयुक्त अरब अमिरातीने भारतास मेडिकल ऑक्सिजन कंटेनरची मदत पाठविली आहे.

देशात वेगवेगळ्या ठिकाणी पाठवणार ऑक्सिजन कंटेनर

जीएसएफ जिजेल हे जहाज ऑक्सिजनचे चार कंटेनर घेऊन दुबईतील जबल अलीहून 5 मे रोजी भारताकडे रवाना झाले होते. ते आज जेएनपीटी बंदरात दाखल झाले आहे. लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे हे कंटेनर देशातील वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात येतील आणि सध्याच्या कोरोना स्थितिवर मात करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाईल. भारत सरकारच्या बंदरे, नौकानयन व जलवाहतूक मंत्रालयाच्या निर्देशानुसार विदेशातून मदत घेऊन येणाऱ्या जहाजांना जेएनपीटी बंदरामध्ये नि:शुल्क सेवा दिली जात आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन कंटेनरची विनामूल्य हाताळणी करण्यासाठी सर्व संसाधने उपलब्ध करून दिली आहेत.

जेएनपीटी अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी वचनबद्ध

याबाबत बोलताना जेएनपीटी चे भा.प्र.से.अध्यक्ष संजय सेठी म्हणाले की, 'कोविड-19 च्या जागतिक माहामारीच्या काळात गेले वर्षभर जेएनपीटी आपल्या भागधारकांसोबत देशातील पुरवठा साखळी निरंतर सुरू ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. या आव्हानात्मक काळात आम्ही आमचे कर्तव्य बजावून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी वचनबद्ध आहोत. गेल्या काही महिन्यांपासून अनेक आव्हानांना सामोरे जात असूनही आम्ही माल हाताळणीमध्ये निरंतर वाढ केली आहे. एप्रिल 2021 मध्ये, जेएनपीटीने 468,015 टीईयू माल हाताळणी केली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत हाताळणी केलेल्या 283,802 टीईयूच्या तुलनेत 64.91% अधिक आहे.'

हेही वाचा -धाकट्या भावाची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या; तीन तासात अल्पवयीन मुलगा ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details