महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ : काका-पुतण्यांच्या अस्मितेच्या लढाईत कोण मारणार बाजी?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांची कन्या अध्यक्षा अदिती तटकरे यावेळी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून नेतृत्व करणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेत गेलेले अवधूत तटकरे यांनी श्रीवर्धनमधून निवडणूक लढण्यास नकार दिलेला आहे. तरीही काका-पुतण्यांच्या या संघर्षात नेमकं कोण बाजी मारणार हे पहावे लागेल...

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ

By

Published : Sep 29, 2019, 11:04 AM IST

Updated : Sep 29, 2019, 5:23 PM IST

रायगड - जिल्ह्यात असणाऱ्या सात विधानसभा मतदारसंघात, श्रीवर्धन मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. श्रीवर्धनचे विद्यमान आमदार अवधूत तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. विद्यमान तर खासदार सुनील तटकरे यांची कन्या जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, यावेळी श्रीवर्धन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. यामुळे राष्ट्रवादी आपला गड राखणार की, काकांना शह देत अवधूत तटकरे येथे भगवा फडकावणार याची सध्या मतदारसंघात चर्चा सुरू आहे.

काका-पुतण्यांच्या अस्मितेच्या लढाईत कोण मारणार बाजी ?

हेही वाचा... महाराष्ट्र बोलतोय : औरंगाबादचे नवमतदार म्हणतायत, 'निवडणूक ही मूलभूत प्रश्नांवर व्हावी'

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यावेळी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून नेतृत्व करणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेत गेलेले अवधूत तटकरे यांनी श्रीवर्धन मधून निवडणूक लढण्यास नकार दिलेला आहे. शिवसेनेकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नसला तरी भाजपचे कृष्णा कोबनाक हे इच्छुक असून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे., तसेच शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांचेही नाव आघाडीवर आहे. युतीला मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला टक्कर देण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे.

श्रीवर्धन मतदारसंघाचा राजकीय इतिहास

श्रीवर्धन मतदारसंघ हा 1962 पासून ते 1995 पर्यंत अपवाद वगळता हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 1995 ते 2009 पर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता. मात्र 2009 पासून 2019 पर्यंत या मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना श्रीवर्धन मतदारसंघानेच तारल्यामुळे खासदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडली. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अवधूत तटकरे यांनी पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला असला तरी त्यांच्यासोबत कार्यकर्ते गेले नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला कोणताही फटका बसलेला नाही. श्रीवर्धन मतदारसंघ हा शिवसेनेने तीन वेळा राखला असला, तरी अंतर्गत कुरखोडीच्या राजकारणामुळे शिवसेनेला याठिकाणी फटका बसला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अवधूत तटकरे यांना 61038 तर शिवसेनेचे रवी मुंढे याना 60961 मते पडली होती. शिवसेनेचे रवी मुंढे यांचा फक्त 77 मताने पराभव झाला होता. अवधूत तटकरे हे आमदार झाले असले तरी मतदारसंघात त्याचा काहीच प्रभाव राहिलेला नव्हता.

हेही वाचा... औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात मित्र पक्षाचा सेनेला धोका

शिवसेनेची ताकद श्रीवर्धन मतदारसंघात असली, तरी अंतर्गत राजकीय कुरखोडी मोठ्या प्रमाणात आहे. शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे, अड. राजीव साबळे, रवी मुंढे हे इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार आहे हे गुलदस्त्यात आहे. मात्र भाजपनेही श्रीवर्धनमध्ये आपली ताकद वाढवलेली आहे. भाजपाचे कृष्णा कोबनाक यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. भाजपने श्रीवर्धनची जागा मागितली आहे. त्यामुळे युती झाल्यास ही जागा कोणाला मिळेल हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र शिवसेना श्रीवर्धनची जागा सोडणार नाही, असे शिवसैनिकांची भूमिका आहे. युती न झाल्यास मतविभागणी होऊन त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होऊ शकतो.

श्रीवर्धनमध्ये काँग्रेस पक्षही एकेकाळी मजबूत होता. मात्र 2009 नंतर आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला होता. मात्र यावेळी काँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे ही नाराजी कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अदिती तटकरे यांना भोवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा... रणधुमाळी विधानसभेची : निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेना करतीय 'क्लस्टर' प्रचार

असा आहे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ

श्रीवर्धन मतदार संघात रोहा, म्हसळा, तळा, श्रीवर्धन माणगाव तालुके येत आहेत. या मतदारसंघात रोहा येथे औद्यगिक क्षेत्र आहे तर माणगाव तालुक्यात काही प्रमाणात उद्योग धंदे आलेले आहेत. मात्र म्हसळा, तळा, श्रीवर्धन हे तालुके अजूनही मागास राहिलेले आहेत. त्यामुळे या तालुक्याचा विकास आजही रखडलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे हा मतदारसंघ असला तरी नवे उद्योग वा येथील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे येथील सुशिक्षित तरुणांना मुंबई, ठाण्याकडे नोकरीसाठी धाव घ्यावी लागत आहे.

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ : काका-पुतण्यांच्या अस्मितेच्या लढाईत कोण मारणार बाजी ?

हेही वाचा... महाराष्ट्र बोलतोय... पाच वर्षांनंतरही गडचिरोलीतील बोदली गावातील समस्या कायम​​​​​​​

अदिती तटकरे ह्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. अध्यक्षीय काळात अनेक विकासकामे त्यांनी श्रीवर्धन मतदारसंघात केली आहेत. तर विधानपरिषद सदस्य अनिकेत तटकरे तसेच खासदार सुनील तटकरे यांचा या मतदारसंघात नेहमी वावर असतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा मतदारसंघ राखणार की युती पुन्हा श्रीवर्धन मतदारसंघात भगवा फडकवेल हे पाहणे औत्सुकाचे ठरणार आहे. तसेच श्रीवर्धन मतदारसंघात तिरंगी वा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

Last Updated : Sep 29, 2019, 5:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details