महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अलिबाग मुरुड विधानसभा आढावा : युतीचे पारडे जड; शेकाप गड राखणार का? - alibag murud constituency

अलिबाग विधानसभा मतदारसंघ यावेळी शेकाप राखणार की युती, काँग्रेस खेचून आणणार, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, सर्वच पक्षाने आपली ताकद या मतदारसंघात लावली असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार हे नक्की.

अलिबाग मुरुड विधानसभा

By

Published : Sep 18, 2019, 4:47 PM IST

Updated : Sep 19, 2019, 9:24 PM IST

रायगड- विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता राज्यात लागू होण्याची शक्यता आहे. अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात अजूनही कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले नसले तरी संभाव्य उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अलिबाग मुरुड मतदारसंघात शेकापचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या बालेकिल्ल्याला तडा देण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी, चौरंगी लढत पहायला मिळणार आहे. अलिबाग मतदारसंघ शेकापकडे राहणार की जाणार, हे आता मतदारांच्या मतदानावर अवलंबून आहे.

विधानसभा निवडणुकीत अलिबाग मतदारसंघ शेकापकडे राहणार की जाणार, हे आता मतदारांच्या मतदानावर अवलंबून आहे

हेही वाचा - राष्ट्रवादीची 5 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; धनंजय मुंडे परळीतून रिंगणात

अलिबाग मुरुड मतदारसंघावर 30 वर्षांपासून शेकापचे वर्चस्व आहे. एक दोन पर्याय सोडल्यास शेकापचा उमेदवार हा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे पंडित पाटील (76959), शिवसेनेचे महेंद्र दळवी (60865) तर काँग्रेसचे मधुकर ठाकूर यांना 40 हजार मते पडली होती. शेकापचे उमेदवार पंडित पाटील हे 16 हजाराने विजयी झाले होते. शिवसेना दुसऱ्या तर काँग्रेस तिसऱ्या नंबरवर गेली होती.

हेही वाचा - शिवसेनेतील 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता होणार कट? नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप अशी आघाडी झाली होती. अलिबाग विधानसभा मतदारसंघात तीनही पक्ष एकत्र येऊनही हवे तसे मताधिक्य मिळवण्यात आघाडीला अपयश आले होते. त्यामुळे शेकापला हा मोठा धक्का होता. पाच वर्षात शेकापचे आमदार पंडित पाटील हे विकासकामांच्या बाबतीत फेल ठरले असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

शिवसेना भाजप यांचे मतदारसंघात वाढता प्रभाव तसेच काँग्रेसला आलेली मरगळ, शेकापवर असलेली नाराजी ही युतीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप आघाडी असली तरी काँग्रेसही आपला उमेदवार उभा करणार आहे. शिवसेना भाजप यांची युती अद्याप झालेली नाही. त्यामुळे युती झाल्यास युतीच्या उमेदवारास फायदा होऊ शकतो. युती न झाल्यास भाजपही आपला उमेदवार उभा करणार आहे. त्यामुळे शिवसेनेला काही प्रमाणात फटका बसू शकतो. या सर्व पार्श्वभूमीवर अलिबाग विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

अलिबाग विधानसभा मतदारसंघ यावेळी शेकाप राखणार की युती, काँग्रेस हा खेचून आणणार का? हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, सर्वच पक्षाने आपली ताकद या मतदारसंघात लावली असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार हे नक्की.

Last Updated : Sep 19, 2019, 9:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details