रायगड - सध्या राज्यात 32 वे रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी बोरघाट पोलीस आणि पार्ले बिस्किट कंपनीच्या वतीने खंडाळा घाटातील पुणे- मुंबई एक्सप्रेस वेवर वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी पोलिसांनी यमराजांचा वेश परिधान करून वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली.
यमराजांनी केली वाहनचालकांची जनजागृती - Raigad District Latest News
सध्या राज्यात 32 वे रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी बोरघाट पोलीस आणि पार्ले बिस्किट कंपनीच्या वतीने खंडाळा घाटातील पुणे- मुंबई एक्सप्रेस वेवर वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी पोलिसांनी यमराजांचा वेश परिधान करून वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली.
यमराजांनी केली वाहनचालकांची जनजागृती
यमराजांनी केली जगजागृती
मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाटात असलेल्या पोलीस केंद्रासमोर रविवारी हे अभियान राबवण्यात आले. यावेळी चक्क यमराजांनी वाहनचालकांची जनजागृती केली. वेगात वाहन चालवू नका, दारू पिऊन किंवा नशा करून गाडी चालवू नका, रस्त्यावर धोकादायक ठिकाणी वाहने पार्किंग करू नका, दुचाकी वाहने चालवताना हेल्मेटचा वापर करा. अशा विविध सूचना यावेळी पोलिसांनी वाहनचालकांना केल्या.