महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Eco Friendly Ganesh Utsav : पेण तालुक्यात इको फ्रेंडली गणेश उत्सवाचे आयोजन - पेण तालुक्यात इको फ्रेंडली गणेश उत्सवाचे आयोजन

पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यातील मूर्तीकारांच्या सोबत जेएसडब्ल्यू फाऊंडेशनने. रंग अभिमानाचा या संकल्पनेवर आधारित इको-फ्रेंडली गणेशोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणपतीच्या मूर्तींना पर्यावरणस्नेही रंगांनी रंगविण्याबद्दल मूर्तिकारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

Eco Friendly Ganesh Utsav
इको फ्रेंडली गणेश उत्सव

By

Published : Aug 7, 2022, 7:30 PM IST

पेण- रायगड : मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील बहुतेक भागात विकल्या जाणाऱ्या गणेशमूर्ती रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात तयार होतात. मूर्तिकारांनी तयार केलेल्या गणेशमूर्ती महाराष्ट्र तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही लोकप्रिय आहेत. म्हणूनच मोठ्या संख्येने मूर्तिकार राहत असलेल्या पेण या गावाला गणेशमूर्तींचे निवासस्थान म्हणले जाते. दर वर्षी अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रातील तलाव, नद्या आणि समुद्रात लाखो गणेशमूर्तींचे विसर्जन होते. व्हीओसीचे प्रमाण कमी असलेले रंग वापरण्याबाबत जागृती निर्माण करण्याचे आणि समुद्रातील जीवांना असलेला धोका कमी करण्याचे पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details