महिला दिन : सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या नजरेतून - महिला
महिला दिनाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विजया पालव आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्याशी साधलेला संवाद.
रायगड - जागतिक महिला दिन म्हणजेच महिलांच्या संघर्षाची आठवण करून देणारा दिवस. प्रत्येक क्षेत्रात आज महिलेने आपले प्राबल्य दाखवून दिले आहे. तरीसुद्धा तिला आजही समाजात दुय्यम वागणूक मिळत असल्याची अनेक उदाहरणे आपण पाहत असतो. महिला दिनाचा खरा अर्थ काय असेल? या प्रश्नाचे उत्तर शोधून काढण्याचा प्रयत्न 'ईटीव्ही भारत'ने केला आहे. याबाबत सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विजया पालव आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी प्रमिला पवार यांनी.
नेहमीची येणारा महिला दिन आला की मग त्यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम सुरू होतात. विविध उपक्रम, सक्षमीकरण, वेगवेगळे चर्चासत्र, विविध दुकानातून आकर्षक सवलतींचे फलक, सारे उत्सव सुरू होतात. केवळ महिला दिनाला त्यांच्या स्वावलंबनाच्या गप्पा मारल्या जातात. परंतु, नुसते दिवस साजरे करून तिला स्वातंत्र्य मिळणार नाही. तर ते प्रत्यक्षात अमलातही आणले पाहिजे. आजच्या पिढीच्या नजरेतून महिला दिनाचे महत्त्व नेमके आहे का? हेदेखील तपासून पाहायला हवे.
लावणी सम्राज्ञी विजया पालव -
हल्ली शहरांमध्ये सर्रास लावणीचे कार्यक्रम केले जातात. महाराष्ट्रातील नेत्यांचे लावणीवर असलेले प्रेम असल्यामुळे लावणीचे प्रश्न शासनदरबारी पोहोचण्यास मदत झाली आहे. अनेक शासकीय कार्यक्रमांमध्ये लावणी सादर होत असल्याने महाराष्ट्राची लोकसंस्कृती म्हणजे लावणी हे रुजणयास मदत झाली आहे. सिनेमांमधून विशेषतः लावणीचे सर्व प्रकार प्रसिद्ध झाले. त्यामुळे लावणी कलावंतांकडे बघण्याची समाजाची दृष्टी बदलली आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील -
उच्चशिक्षित असल्याने काहीतरी करावेसे वाटते. पण संसारात अडकल्याने केवळ गृहिणी बनून राहिलेल्या महिला असतात. त्यांना संघटित करून त्यांच्यातील उर्मिला बळ देऊन समाज कार्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्याचे काम गेल्या अनेक दशकांपासून वेगवेगळ्या माध्यमातून होत आहे. विकासातून समाज विकास हे ब्रीद वाक्य मनात अनेक महिला संसार सांभाळून समाजासाठी योगदान देत आहेत. आजच्या महिला दिनाच्या दिवशी त्यांच्या संघर्षाच्या गाथा ठिकठिकाणी सांगून त्यांची समाजात ओळख होते. त्यांना प्रोत्साहन ही मिळते.