महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आठ महिन्यानंतर जिल्ह्यातील 229 शाळांचीच 'घंटा' वाजली - रायगड शाळा सुरू

सोमवारी 229 शाळेत 6066 विद्यार्थीच दाखल झाले होते. शिक्षकांच्या कोविड तपासणीत जिल्ह्यात 20 शिक्षक तर शिक्षकेत्तर एक कर्मचारी असे 21 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे शिक्षकांची कोविड तपासणी पूर्ण होण्यास आठवड्याचा कालावधी लागेल, असे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

रायगड
रायगड

By

Published : Nov 24, 2020, 6:58 PM IST

रायगड- राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शासनाने 23 नोव्हेंबरला परवानगी दिली. रायगड जिल्ह्यातही शाळा सुरू झाल्या, पण अनेक शिक्षकांचा कोविड तपासणी अहवाल आलेला नसल्याने फक्त 229 शाळेमध्येच 'घंटा' वाजली आहे. सोमवारी 229 शाळेत 6066 विद्यार्थीच दाखल झाले होते. शिक्षकांच्या कोविड तपासणीत जिल्ह्यात 20 शिक्षक तर शिक्षकेत्तर एक कर्मचारी असे 21 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे शिक्षकांची कोविड तपासणी पूर्ण होण्यास आठवड्याचा कालावधी लागेल, असे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

माहिती देताना शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात
229 शाळाच सुरू तर आज 6066 विद्यार्थी शाळेत दाखल
रायगड जिल्ह्यात नववी ते बारावीच्या 644 शाळा आहेत. या शाळेत एकूण 1 लाख 35 हजार 797 विद्यार्थी आहेत. 644 शाळेपैकी 229 शाळेतील शिक्षकांचा कोविड तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. आज फक्त 6066 विद्यार्थी शाळेत दाखल झाले होते. जिल्ह्यात 644 शाळेमध्ये नववी ते बारावीत शिकविणारे एकूण 7151 शिक्षक आहेत. शिक्षकेत्तर कर्मचारी हे 3690 आहेत. असे एकूण 9841 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत.
40 टक्केच शिक्षकांची झाली कोरोना चाचणी
शिकविणाऱ्या 7151 शिक्षकांपैकी 3106 शिक्षकांची कोरोना आरटीपीसीआर तपासणी झाली आहे. तर शिक्षकेत्तर 3690 कर्मचाऱ्यांपैकी 1158 जणांची आरटीपीसीआर तपासणी झाली आहे.
21 जणांना कोरोनाची बाधा
3106 शिक्षकांच्या कोविड तपासणीमध्ये 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये कर्जत 9, खालापूर 3, पनवेल 6 आणि मुरुड 2 शिक्षकांना लागण झाली आहे. शिक्षकेत्तर 1158 पैकी खालापूरमधील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यासाठी संमतीपत्र दिल्यानंतरच शाळेत प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे आज संमती पत्र दिलेले 6066 विद्यार्थी हे शाळेत हजर होते.

ABOUT THE AUTHOR

...view details