रायगड - रोहा तालुक्यातील नागोठणे वेलशेत येथील अंबा नदीच्या पात्रात एक जण बुडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. विठोबा ताडकर (45) असे बुडालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांचा नदीपात्रात शोध सुरू होता. दरम्यान, १२ तासाने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
रायगडमध्ये अंबा नदीत मासेमारीला गेलेल्या एकाचा पाण्यात बुडून मृत्यू - नदी प्रवाह
रोहा तालुक्यातील नागोठणे वेलशेत येथील अंबा नदीच्या पात्रात एक जण बुडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. विठोबा ताडकर (45) असे बुडालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांचा नदीपात्रात शोध सुरू होता. दरम्यान, १२ तासाने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
नागोठणे वेलशेत येथे राहणारे विठोबा उर्फ बाळू ताडकर हे शुक्रवारी रोजी अंबा नदीपात्रात जाळे घेऊन मासेमारीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत एक मित्रही होता. नदीपात्रात मासेमारी करताना ताडकर यांना पाण्याच्या अंदाज न आल्याने ते बुडू लागले. यावेळी मित्राने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नदीचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना वाचविणे शक्य झाले नाही.
त्यानंतर ही घटना ग्रामस्थ व पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन ताडकर यांचा शोध सुरू केला. रात्री एक वाजेपर्यंत ताडकर यांचा शोध घेण्यात आला. मात्र, काळोखामुळे मृतदेह सापडला नाही. त्यानंतर शनिवारी पहाटे पुन्हा शोध सुरू केला असता सकाळी सात वाजता मृतदेह काढण्यात यश आले. त्यानंतर विठोबा ताडकर यांचा मृतदेह नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविले.