रायगड - महाड तालुक्यातील तळीये येथील दरड दुर्घटनेतील जखमी महिलेचा गुरुवारी संध्याकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. संगीता कोंडाळकर असे या मृत महिलेचे नाव आहे.
तळीये दरड दुर्घटना; जखमी महिलेचा मृत्यू, जे जे रुग्णालयात सुरू होते उपचार - जे जे रुग्णालयात महिलेचा मृत्यू
रायगड जिल्ह्यातील तळीये या गावात दरड कोसळून 84 नागरिकांचा बळी गेला होता. तर अनेकजण जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील जखमी महिला मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल होती. मात्र उपचारादरम्यान या महिलेची प्राणज्योत मालवली आहे.
मृत संगीता कोंडाळकर
जखमी संगीता कोंडाळकर यांच्यावर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरू होते. तळीये दरड दुर्घटनेत आतापर्यंत 84 जणांचा मृत्यू झाला होता. आता मृतांची संख्या 85 वर पोहोचली आहे.