रायगड - मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या काशीद समुद्रात पोहण्यासाठी गेलेले पद्माकर तामाजीराव जाधव (वय 44 रा. पुणे) हे बेपत्ता झाले आहेत. मुरूड पोलीस आणि काशीद ग्रामस्थांच्या साहाय्याने त्यांचा शोध सुरू आहे.
काशीद समुद्रात पोहण्यासाठी गेलेला एक जण बेपत्ता - पुणे येथील पद्माकर जाधव
मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या काशीद समुद्रात पोहण्यासाठी गेलेले पद्माकर तामाजीराव जाधव (वय 44 रा. पुणे) हे बेपत्ता झाले आहेत. मुरूड पोलीस आणि काशीद ग्रामस्थांच्या साहाय्याने त्यांचा शोध सुरू आहे.

पुणे येथील पद्माकर जाधव हे पत्नी अपर्णा जाधव आणि दहा वर्षीय मुलगा पराग जाधव यांच्यासह काशीद दुपारी बारा ते एकच्या दरम्यान समुद्रकिनारी फिरण्यासाठी आले होते. पद्माकर पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बेपत्ता झाले. जाधव यांच्या पत्नी व मुलाने या प्रकारानंतर आरडाओरड केली. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी जाधव यांना पोलिसांच्या साहाय्याने शोधण्यास सुरुवात केली.
मुरूड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विनोद तांबोळी, पोलीस उप निरीक्षक विजय गोडसे हे मुरुड पोलीस ठाण्याचे इतर कर्मचारी आणि काशीद ग्रामस्थांच्या सहकार्याने पद्माकर यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, अंधार पडल्यामुळे आजच्यासाठी ही शोध मोहीम थांबवण्यात आली आहे.