महाराष्ट्र

maharashtra

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे'वर बसचा अपघात; १ ठार तर १६ जखमी

मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सातारा इथून मुंबईकडे निघालेली बस पनवेल बायपास जवळ आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी पुढे चाललेल्या वाहनाला घासत पुढे गेली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत.

By

Published : Nov 26, 2020, 8:15 AM IST

Published : Nov 26, 2020, 8:15 AM IST

Updated : Nov 26, 2020, 1:38 PM IST

accident
अपघात

रायगड- मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर पनवेल जवळ एसटी बसला मध्यरात्री अपघात झाला. या अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला तर 16 प्रवासी जखमी झाले. जखमीपैकी काहींची प्रकृती गंभीर असून सर्वांवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील मृत व्यक्ती मुंबईत बेस्टचा चालक असल्याचे समजते.

चालकाचे नियंत्रण चुकून घडला अपघात -
मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सातारा इथून मुंबईकडे निघालेली बस पनवेल बायपास जवळ आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी पुढे चाललेल्या वाहनाला घासत पुढे गेली. या अपघातात बसचा पत्रा कापला गेला.

एक ठार, 16 जखमी -
या अपघातात मुंबई बेस्ट चालक हे एसटीने प्रवास करीत होते. त्याचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर 16 प्रवासी जखमी झाले आहेत. प्रवासी हे झोपेत असल्याने अपघात झाल्याचे काही क्षण त्यांना कळलेच नाही. जखमींना त्वरित कामोठे रुग्णालयात हलविण्यात आले.

परिसरातील मदतनीसांनी केली मदत -
अपघात एवढा मोठा होता की आवाजाने बाजूला असलेले देवदूत यंत्रणेचे जवान आणि पोलीस तातडीने घटनास्थळी धावून आले. रेस्क्यू ऑपरेशन सूर असताना किंकाळ्या आणि विव्हळणे ऐकू येत होते. तातडीने जखमींना रुगणलायत हलविले. अपघातानंतर महामार्ग पोलीस आणि आय आर बी यंत्रणेने मदत कार्य सुरू केले. पनवेल आगार व्यवस्थापक विलास गावडे व कर्मचारी रुग्णालयात पोहोचले असून जखमींवर योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

परिवहन मंत्र्यांकडून मदत जाहीर -

या अपघातातील मृत प्रवाशाच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केली आहे. अनिल परब यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

Last Updated : Nov 26, 2020, 1:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details