महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडमध्ये एकाला कोरोनाची लागन, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क

रायगड जिल्ह्यातील कामोठे पनवेल येथे एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. हा कोरोना बाधित रुग्ण दुबई येथून आला होता. त्याच्यावर मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

one gets corona patient found in Raigad
रायगडमध्ये एकाला कोरोनाची लागन

By

Published : Mar 15, 2020, 1:36 PM IST

रायगड - देशात कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशात जवळपास १०७ लोकांना, तर राज्यात ३२ जणांना कोरोनाची लागन झाली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील कामोठे पनवेल येथे एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

पनवेल येथील कामोठेमधील कोरोना बाधित रुग्ण हा दुबई येथून आला होता. या रुग्णाला ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे आढळल्यानंतर त्याचे रक्त, थुंकी तपासणीसाठी मुंबई येथे पाठवण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला असून, या रुग्णावर मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयाच्या विलगिकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

रायगड जिल्ह्यात पनवेल येथे इराणमधून आलेले ४ जण कोरोना बाधित आढळले असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांना कोणतीच बाधा झाली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली होती. मात्र, आता रायगडमध्ये एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे.

आताच्या घडीला महाराष्ट्रात ३२ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यात कामोठे (पनवेल) नवी मुंबईमध्ये पुणे, मुंबई, कल्याण नागपूर, अहमदनगर, ठाणे, यवतमाळ या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्र आणि भारतावर कोरोनाचं संकट वाढत असताना दररोज कोरोनाग्रस्त पॉझिटिव्ह संख्येत भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालय अंगणवाड्या या 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. यासंबंधीचा जीआर देखील सरकारने काढला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मोठ्या प्रमाणात एका ठिकाणी जमू नका, गर्दीची ठिकाणं टाळा असं सुचवण्यात आले आहे. नागपूर, मुंबई , नवी मुंबई , ठाणे , पुणे , पिंपरी चिंचवड याठिकाणची नाट्यगृह, सिनेमागृह, जिम, व्यायामशाळा , स्विमिंग पूल बंद करण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details