रायगड: महाड एमआयडिसि (Mahad MIDC) विभागामध्ये असणाऱ्या प्रसोल केमिकल कंपनीमध्ये (Prasol Chemical Company) सोमवारी संध्याकाळी अचानक वायू गळती झाल्याने, येथील परिसरामध्ये आफरातफरीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान वायुगळती नंतर एका कर्माचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर दोन कर्मचारी गंभीर असल्याची माहिती देण्यात येत आहे. जितेंद्र आडे (Jitendra Aade 40) असे मृत कामगाराचे नाव असून, प्रशांत किंकले (Prashant Kinkale) आणि मिलिंद मोरे (Milind More) हे दोन कर्मचारी गंभीर असल्याने महाड मधील खासगी रुग्णालायात उपचार सुरु आहेत.
Air leak in chemical company : रायगडमध्ये केमिकल कंपनीमध्ये वायुगळतीने एकाचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी - Prashant Kinkale
रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी (Mahad MIDC) मध्ये प्रसोल केमिकल कंपनीमध्ये (Prasol Chemical Company) वायू गळती झाल्याने, एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर दोन कर्मचारी गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जखमीवर महाडमधील खासगी रुग्णालायात उपचार करण्यात येत आहेत.
कंपन्याच्या कामाकाजाबाबत प्रश्नचीन्ह:रायगड जिल्ह्यामाध्ये विकास कामांना गती येत असून, एमआयडीसीच्या माध्यमातून विकास सुरु आहे. महाड मध्ये एमआयडीसीच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठमोठे प्रकल्प तयार करण्यात आले आहेत. या प्रकल्पमध्ये अपघात होण्याआचे प्रकार घडत असतात. अशाच प्रकारे सोमवारी झालेल्या अपघातामध्ये जितेंद्र आडे यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यामुळे येथील कंपन्याच्या कामाकाजाबाबत प्रश्न निर्माण होत आहेत.