रायगड -जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मोर्बे धरणात अंघोळ करण्यासाठी गेलेल्या एका आदिवासी शेतमजूराचा बुडून मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी माहिती देण्यात आली आहे.
अंघोळीला गेला आणि बुडाला -
नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या मोर्बे धरणात हिऱ्या महादू भला (४९) रा. तीनघर ठाकूरवाडी या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला आहे. धरणाच्या वरच्या भागात सरपण आणण्यासाठी हा व्यक्ती पत्नीसह गेला होता. तेथून घरी आल्यावर धरणावर अंघोळीला गेला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो धरणात दुर गेला आणि समोर धरणात चिखलात त्याचा पाय फसला. तो दिसेनासा झाल्यावर त्याच्या पत्नीने एकच आरडाओरड सुरू केली. तेथे गावातील लोकांनी धाव घेऊन त्याला पाण्याच्या बाहेर काढले. पोलिसांना याविषयी कळताच त्यांनी घटना स्ठळी धाव घेतली.