रायगड -जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनारी पॅरासेलिंग करताना दोरी तुटून वडील आणि मुलगा खाली पडून अपघात झाला. यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाला असून वडिलांना मुरुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दरम्यान पॅरासेलिंग चालकावर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगडमध्ये पॅरासेलिंग करताना दोर तुटून बाप-लेक कोसळले; मुलाचा जागीच मृत्यू - रायगड
बापलेक दोघेही मुरुड समुद्र किनाऱ्यावर असलेले पॅरासेलिंग करण्यासाठी गेले होते. पॅरासेलिंग उंच झेपावल्यानंतर काही वेळातच दोर तुटल्याने दोघेही वरून खाली कोसळले
वेदांत गणेश पवार (वय १५) असे मृत मुलाचे नाव आहे. गणेश पवार हे आपला मुलगा वेदांत आणि कुटुंबासह पुण्यातील कसबा रोड येथून मुरुड येथे फिरायला आले होते. सर्वजण समुद्रावर मौजमजा करीत सुट्टीचा आनंद लुटत होते. त्यावेळी पवार बाप-लेक दोघेही मुरुड समुद्र किनाऱ्यावर असलेले पॅरासेलिंग करण्यासाठी गेले होते. पॅरासेलिंग उंच झेपावल्यानंतर काही वेळातच दोर तुटल्याने दोघेही वरून खाली कोसळले. या अपघातात वेदांत खाली पडल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश पवार हे गंभीर जखमी झाले. वेदांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.