रायगड - कोरोनामुळे मुंबई-पुणे महामार्ग काही दिवस बंद होता त्यामुळे अपघाताचे प्रमाण घटले होते. मात्र, टाळेबंदी शिथिल झाली आणि पुन्हा महामार्गावर वाहने जलद गतीने सुरू झाले. परिणामी अपघाताच्या घटना घडण्यास सुरू झाल्या. आज (बुधवारी) पहाटे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली एक्झिट दरम्यान वेगवेगळे तीन अपघात होऊन या अपघातात 1 ठार तर चार जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आलेले आहे. या अपघातामुळे खोपोलीकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
पुणे येथून मुंबईकडे येताना खोपोलीकडे जाणाऱ्या एका अवघड वळणावर कोळशाची ट्रक पलटी झाली. या अपघातात 1 ठार तर एक जण जखमी झाला आहे. दुसऱ्या घटनेत बोरघाट उतरताना खोपोलीमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रकचा अपघात झाला. यात चालक जखमी झाला असून, त्याला लोकमान्य हॉस्पिटल निगडी येथे हलविण्यात आले आहे. तर तिसऱ्या घटनेत याच मार्गावर सहा ट्रक एकमेकांवर आदळून अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
खोपोली एक्झिट दरम्यान तीन वेगवेगळे अपघात; एक ठार तर चार जण जखमी - mumbai pune highway accident
आज (बुधवारी) पहाटे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली एक्झिट दरम्यान वेगवेगळे तीन अपघात होऊन या अपघातात 1 ठार तर चार जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आलेले आहे.
खोपोली एक्झिट दरम्यान तीन वेगवेगळे अपघात; एक ठार तर चार जण जखमी
खोपोली एक्झिटवर पहाटे पाच वाजताच्या सुमारास हे अपघात घडले. यामध्ये एक ठार तर चार जखमी झाले आहेत. वाहतूक विभागाने अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली आहे.