महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खालापुरात रिक्षा पलटी होऊन एकाचा मृत्यू, चालक मात्र सुखरुप - खालापूर रिक्षा अपघात एक ठार

खोपोली पेण रोडवरुन खोपोलीकडुन आडोशी रोडवरील ढेकु येथे जात असलेली रिक्षा वळण घेताना पलटी झाली. रिक्षामधील एक प्रवासी जागेवरच ठार झाला, तर अन्य दोन प्रवाशांसह दोन चिमुकले जखमी झाले आहेत.

rickshaw accident
खालापूर रिक्षा अपघात

By

Published : Mar 15, 2022, 8:16 PM IST

खालापूर(रायगड) - खोपोली पेण रोडवरुन खोपोलीकडुन आडोशी रोडवरील ढेकु येथे जात असलेली रिक्षा वळण घेताना पलटी झाली. रिक्षामधील एक प्रवासी जागेवरच ठार झाला, तर अन्य दोन प्रवाशांसह दोन चिमुकले जखमी झाले आहेत. त्यांना खोपोली येथील नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दोन छोट्या मुलांसह चार जण जखमी-

१५ मार्च रोजी सुमारे दुपारी ४ च्या सुमारास खोपोली पेण रोडने पेणच्या दिशेला चाललेली तीन आसनी रिक्षा खोपोलीतील रिशीवन हाँटेलजवळ अचानक पलटी झाली. यात बसलेल्या प्रवाशांपैकी अनिल प्रजापती हे रिक्षातून बाहेर फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत प्रवास करणारा दिपक गाँड (वय ३०) हे किरकोळ जखमी झाले तर दिपक यांची पत्नी शांतीदेवी (वय २९) या गंभीर जखमी आहेत. त्यांचे दोन चिमुकले रजत (वय ७) तर अन्य एक तीन वर्षाचा बालक हे जखमी झाले आहेत. पत्नी शांतीदेवी या गंभीर जखमी असल्याने खोपोली नगरपालिका रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन त्यांना एम जी एम कामोठे येथे हलविण्यात आले आहे. तर ७ वर्षाच्या रजतला छातीला मुक्का मार लागला असून, त्याच्यावरही खोपोली रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मृत अनिल प्रजापती, जखमी दिपक गोड हे दोघेही खालापूर तालुक्यातील ढेकु येथील रिद्धी सिद्धी कंपनीत कामाला होते. परंतु, एवढ्या मोठ्या जीवघेण्या अपघातात MH.46. B.0810 या रिक्षाचे खुप नुकसान झाले आहे. तर रिक्षा चालक मात्र सुखरुप असल्याचे समजते.

ABOUT THE AUTHOR

...view details