रायगड- येथील अलिबाग तालुक्यातील आवास येथे एका वृद्ध महिलेची अज्ञात इसमाने झोपेतच गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. प्रभावती म्हात्रे (87) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. हत्या केलेल्या वृद्धेच्या अंगावरील सोने अज्ञाताने पळविले आहे. या हत्येबाबत मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
रायगडमध्ये वृद्धेची हत्या; अंगावरील सोने लंपास - रायगड बातमी
अलिबाग तालुक्यातील आवास गावात तळ्याच्या जवळ प्रभावती म्हात्रे यांचे घर आहे. या घरात त्या एकट्याच राहत होत्या. त्यांची दोन मुले ही कामानिमित्त मुंबईत राहतात. 31 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता प्रभावती म्हात्रे या घरी झोपेत असताना कोणीतरी अज्ञाताने येऊन त्यांची झोपेतच गळा दाबून हत्या केली.
हेही वाचा-अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला करणारा माथेफिरू पोलादपूर पोलिसांच्या ताब्यात
अलिबाग तालुक्यातील आवास गावात तळ्याच्या शेजारी प्रभावती म्हात्रे यांचे घर आहे. या घरात त्या एकट्याच राहत होत्या. त्यांची दोन मुले ही मुंबईत कामानिमित्त राहतात. 31 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता प्रभावती म्हात्रे ह्या घरी झोपेत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने येऊन त्यांचा झोपेतच गळा दाबून हत्या केली. त्यानंतर म्हात्रे यांच्या अंगावरील सोने घेऊन पसार झाला. हत्येची घटना कळल्यानंतर मांडवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डी पी. सोनके यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक जमाल शेख यांनी सुद्धा घटनास्थळी पाहणी केली. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह अलिबाग येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. वृद्ध महिलेची हत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेल नाही. वृद्ध महिलेच्या हत्येबाबत मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मांडवा पोलीस निरीक्षक डी. पी. सोनके करीत आहेत.