रायगड- फरार हिरे व्यापारी नीरवमोदी याचा किहीम येथील रुप्पन्या बंगला शुक्रवारी ८ मार्च रोजी स्फोटकाने उडवून जमीनदोस्त करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण तयारी झाली आहे. उद्या ९ ते १० वाजेपर्यत हा बंगला जमीनदोस्त होणार आहे.
नीरवमोदी यांचा किहीम येथील ३० हजार स्केअर फुटचा बंगला जिल्हाधिकाऱ्यांनी सीआरझेडचे (किनारी क्षेत्र) उल्लंघन केल्याबद्दल अनधिकृत ठरवला होता. त्यानंतर १७ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाकडून बंगल्यावर कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. यासाठी जेसीबी व पोकलेनच्या साहाय्याने पाडण्याचे काम सुरू केले होते. मात्र बंगल्याचे बांधकाम मजबूत असल्याने जेसीबीच्या साहाय्याने पाडणे कठीण जात होते. त्यामुळे हा बंगला स्फोटाकाने पाडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला होता.