रायगड - माथेरान घाटामध्ये असलेल्या दोन फूट उंचीच्या सुरक्षा कठड्यावर एक जिप्सी हवेत तरंगत असल्याची थरारक घटना समोर आली आहे. माथेरान घाटातील वॉटरपाईप स्टेशनच्या वरच्या चढणीला हा अपघात झाला. या गाडीत नऊ प्रवासी प्रवास करत होते. दैव बलवत्तर म्हणून या अपघातात त्यांचा जीव वाचला व मोठी दुर्घटना टळली.
काळ आला होता पण...; नऊ प्रवाशांचे वाचले जीव - माथेरान घाट लेटेस्ट अपघात न्यूज
घाट रस्त्यांवर काळजीपूर्वक वाहने चालवली नाहीत तर अनेकदा अपघात होतात. अशा अपघातांमध्ये जीवही जातात. माथेरानच्या घाटातही असाच एक अपघात झाला मात्र, दैव बलवत्तर म्हणून कुठलीही जिवीतहानी झाली नाही.
![काळ आला होता पण...; नऊ प्रवाशांचे वाचले जीव jeep](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10360029-979-10360029-1611469145320.jpg)
एखाद्या सिनेमातील थरारक दृश्याप्रमाणे अपघात -
मिळालेल्या माहिती नुसार एक जिप्सी मुंबईहून माथेरान फिरण्यासाठी नेरळ येथे आली होती. या वाहनासोबत आणखी काही वाहने होती. नेरळ येथून माथेरानचा अवघड घाट चढतानाही वाहनचालकाने गाडीचा वेग कमी केला नाही. वॉटरपाईप स्टेशनच्या वरचा अवघड चढणीला वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे वाहन खोल दरीच्या बाजूला असलेले लोखंडी ग्रील तोडून सिमेंट-क्राँक्रिटच्या दोन फूट उंच सुरक्षा कठड्यावर गेले व हवेत अधांतरी लटकू लागले. दैव बलवत्तर म्हणून हे वाहन दरीत कोसळले नाही. या वाहनातील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.