रायगड- मरावे परी दृष्टी रुपी उरावे, या उक्तीचाअनुभव नुकताच खोपोली शहरात आला. खोपोली शहरातील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश अभाणी यांच्या पत्नी निकिता अभाणी यांनी आपल्या मृत्यूनंतर नेत्रदान करावे अशी इच्छा आपल्या कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती. त्यांचे नुकतेच वयाच्या 51 व्या वर्षी निधन झाले. आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या मुलाने व तिच्या पतीने कुटुंबीयांकडे केली असता त्यांनी सुध्दा याला सहमती दिल्याने तिचे दोन्ही डोळे तात्काळ दान करण्यात आले आहेत.
खोपोलीतील निकिता अभाणी यांनी मर्णोत्तर केले नेत्रदान
निकिता अभाणी यांनी आपल्या मृत्यूनंतर नेत्रदान करावे अशी इच्छा आपल्या कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती. त्यांचे नुकतेच वयाच्या 51 व्या वर्षी निधन झाले.
अवघ्या 51 वर्षाच्या होत्या निकिता अभाणी
18 मार्च रोजी वेळ दुपारची अडीच वाजताची अचानक सौ.निकिता यांना चक्कर आली आणि त्या जमिनीवर कोसळल्या, त्यांना उलटी झाली. राजेशने धावत जाऊन आपल्या पत्नीला सावरण्याचा प्रयत्न केला पण त्या काहीच प्रतिसाद देत नव्हत्या. राजेशला वेगळीच शंका आली. त्याने लागेच फोन करून काही मित्रांना घरी बोलावून घेतले. त्याचवेळी डॉक्टर चंदनशिवे यांनी देखील ताबडतोब घरी पोचत निकिताची तपासणी केली मात्र, दुर्दैवाने तिची प्राण ज्योत मालवली होती.
हेही वााचा-कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने वाढली चिंता; शेअर बाजार निर्देशांकात ८७१ अंशांची पडझड