महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड किल्ल्याखालील हिरकणीवाडीकरांनाही तळीये होण्याची भीती - रायगड दरड कोसळली

रायगड किल्ल्याखाली असलेल्या हिरकणीवाडीचीही तळीये गावासारखी परिस्थिती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तळीये गाव 22 जुलैच्या सायंकाळी अतीवृष्टीने दरड कोसळून गायब झाले. येथे तब्बल 32 कुटुंब दरडीखाली दबली गेली.

hirkaniwadi
hirkaniwadi

By

Published : Jul 24, 2021, 4:43 PM IST

रायगड - रायगड किल्ल्याखाली असलेल्या हिरकणीवाडीचीही तळीये गावासारखी परिस्थिती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तळीये गाव 22 जुलैच्या सायंकाळी अतीवृष्टीने दरड कोसळून गायब झाले. येथे तब्बल 32 कुटुंब दरडीखाली दबली गेली. आतापर्यंत 49 मृतदेह सापडले आहेत. आणखी शोधकार्य सुरूच आहे. त्यासाठी एनडीआरएफ, प्रशासन आणि स्थानिक लोक काम करत आहेत.

हिरकणीवाडीकरांनाही तळीये होण्याच्या भीती

हिरकणीवाडीतही भूस्खलन, ग्रामस्थ भयभीत

तर पोलादपूर तालुक्यातील केवनाळे आणि गोवले सुतारवाडी या ठिकाणी घरावर दरड कोसळून 11 जण गाडले गेले. या दुर्घटना ताज्या असतानाच किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावावरही दरडीची टांगती तलवार आहे. या गावातही भूस्खलन होऊन अनेक घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने या वाडीतील नागरिकांचे त्वरित स्थलांतर करून पुनर्वसन करावे, अशी मागणी पुंडलिक अवकिरकर याने केली आहे. अन्यथा तळीयेप्रमाणे हे गावही नकाशावरून गायब होईल, अशी भीतीही त्याने व्यक्त केली आहे.

हिरकणीवाडीतही भूस्खलन

गावातील फक्त 4 जणच बाहेर

किल्ले रायगडच्या पायथ्याशी हिरकणीवाडी हे 100 लोकवस्ती असलेले गाव आहे. जिल्ह्यात 21 जुलैपासून अतिवृष्टी सुरू झाली आहे. यात महाड, पोलादपूर तालुका पूरमय झाला आहे. शिवाय आतापर्यंत दरडी कोसळून 100 हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. आज सकाळच्या सुमारास दरड कोसळली आहे. हिरकणी गावातील डोंगरही ढासळू लागल्याने दरडी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. गावातील अनेक घरांना तडेही गेले आहेत. कोरोना संकटामुळे गावातील अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या असल्याने ते गावीच आहेत. त्यामुळे शेकडो ग्रामस्थ या गावात सध्या वास्तव्य करत आहेत. गावातील फक्त 4 जणच कल्याण येथे आहेत.

हिरकणीवाडीकरांना तळीये होण्याची भीती

22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत डोंगराचा काही भाग पाण्यातून वाहून गेला आहे. पुंडलिक अवकिरकर याच्या घराच्या मागच्या भागातील मातीचे भूस्खलन झाले आहे. किल्ले रायगडावरील डोंगरातूनही मोठमोठे दगड घरावर पडत आहेत. गावातील सर्वच घरांना तडे गेले आहेत. तरुण मंडळी रात्रभर जागून पहारा देत आहेत. सध्याची परिस्थिती ही हिरकणी गावातील दरडग्रस्त झाली आहे. लवकरात लवकर ग्रामस्थांचे स्थलांतर होणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा हिरकणीवाडीची तळीये होण्यास वेळ लागणार नाही, असे पुंडलिकने म्हटले आहे.

हेही वाचा -सत्य छापतात म्हणून धाड टाकून धमकावणे योग्य नाही, दैनिक भास्करवरील कारवाईवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details