रायगड (खालापूर)- कर्जत नगरपरिषद हद्दीतील आकुर्ले गावात अद्यावत व्यायाम शाळा उभारावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून युवकांची होती. याचीच दखल घेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधाकर घारे यांनी आमदार अनिकेत तटकरेंच्या स्थानिक विकास कार्यक्रम 21-22 माध्यमातून दहा लाखांचा निधी मिळावा अशी मागणी केली होती. ही मागणी मान्य झाली असून लवकरच आकुर्ले येथे अद्यावत व्यायाम शाळा उभारण्यात येणार असल्याने तरुण मंडळीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्व तरुण मंडळीनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधाकर घारे आभार मानले आहे.
सुधाकर घारे यांच्या प्रयत्नांना यश
वाढती रोगराई, आजार याला रोखायचे असेल तर शरीर तंदुरुस्त हवे. त्यासाठी नित्यनियमाने व्यायाम हवा. त्यामुळेच आपल्या गावातील तरुणांना हक्काची व्यायाम शाळा हवी, अशी इच्छा येथील तरुणांची होती. ती अखेर जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या पुढाकाराने पूर्ण झाली असून या संदर्भातले पत्र सुधाकर घारे यांनी दिले आहे.