महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 6, 2020, 8:35 PM IST

ETV Bharat / state

राज्य परिवहन महामंडळाच्या बस आता आणखी हायटेक

एसटी बसमध्ये व्हिटीएस (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम) आणि पीआयएस( पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टम) प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे, बस नक्की कुठे आहे, किती वाजता येणार, त्यामधील चालक, वाहक आणि बसचा नंबर, ही सर्व माहिती प्रवाशांना एका क्लिकवर मिळणार आहे. एसटी बसही हायटेक होणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. अलिबाग आणि महाड आगारामध्ये या सुविधा प्रायोगिक तत्वावर सुरू झाल्या आहेत.

bus
प्रातिनिधीक छायाचित्र

रायगड -रेल्वे, विमान, कॅब या माध्यमांमध्ये प्रवासी वाहतूक सेवेबाबत आपले वाहन किती वाजता ईच्छित स्थळी पोहोचणार याची अद्ययावत माहिती प्रवाशांना मोबाईल अॅपद्वारे मिळते. मात्र, आता ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असलेल्या एसटी बसमध्येही व्हिटीएस (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम) आणि पीआयएस( पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टम) प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या बस आता आणखी हायटेक

यामुळे बस नक्की कुठे आहे, किती वाजता येणार, त्यामधील चालक, वाहक आणि बसचा नंबर, ही सर्व माहिती प्रवाशांना एका क्लिकवर मिळणार आहे. एसटी बसही हायटेक होणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. अलिबाग आणि महाड आगारामध्ये या सुविधा प्रायोगिक तत्वावर सुरू झाल्या आहेत. इतर सहा आगारांमध्येही ही प्रणाली लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बससाठी ताटकळत बसण्याची गरज पडणार नाही.

हेही वाचा -एसटी प्रवासभाडे सवलतीसाठी ‘स्मार्टकार्ड’ बंधनकारक करण्यास मुदतवाढ

राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सुखकारक, आरामदायी आणि वातानुकूलित प्रवासाची सुविधा देण्यासाठी शिवनेरीसारख्या गाड्या सेवेत आणल्या आहेत. एसटी बसला अजून आधुनिक करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही प्रणाली पूर्णत्वास येण्यास दोन महिने लागणार असून मोबाईल अॅप्लिकेशन सुरू होण्यास सहा महिने लागणार असल्याची माहिती, व्हिटीएस सिस्टमचे प्रमुख राहुल घरत यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details