रायगड - रायगड लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्या प्रचाराला आज सुरुवात होत आहे. महाड येथून त्यांच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. या सभेला सुनिल तटकरेंसह शिरुर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित असणार आहेत.
आज महाडमध्ये आघाडीची प्रचारसभा; सुनिल तटकरेंसह अमोल कोल्हेंची उपस्थिती - tatkare
महाड येथील चांदे मैदानावर ही सभा होणार आहे. सुनिल तटकरे यांचे नाव पहिल्याच यादीत जाहीर झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाड येथील चांदे मैदानावर ही सभा होणार आहे. सुनिल तटकरे यांचे नाव पहिल्याच यादीत जाहीर झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे सांगण्यात येत आहे. सभेच्या सुरुवातीला रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर, चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन सभेला सुरुवात होईल.
राष्ट्रवादीचे शिरूर मतदार संघाचे उमेदवार अमोल कोल्हे, रायगडचे उमेदवार सुनील तटकरे, राष्ट्रीय काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष माणिक जगताप, शेकापचे नेते जयंत पाटील, आमदार अनिकेत तटकरे आदी मान्यवर सभेला उपस्थित राहणार आहेत. सभेला साधारण १५ हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील असे सांगण्यात येत आहेत.